Monday, November 2, 2009

कलावंतीण दुर्ग......२५/१०/२००९



कलावंतीण दुर्गाचे बरेचसे फोटो इमेल मधून पाहीले होते....तेव्हापासून ह्या ट्रेकचा बेत ठरत होता......
पण हा ट्रेक पावसाळ्यात करण्यासारखा नाही अस बर्याच जणांकडुन कळल्याने मुहूर्त मात्र लागत नव्हता....
finally....नेहा ने ह्या ट्रेकचा योग जुळ्वुन आणला....
भल्या पहाटे चेबुंर-पनवेल लोकल पकडायची आणि ७.३० ची पनवेल-ठाकुरवाडी बस पकडायची अस सर्वानुमते ठरवण्यात आलं....पण "ठरवल्याप्रमाणे" सगळ पार पडलं तर त्यात मजा कसली???
अगदी "उत्साहात" पहाटे आम्ही म्हणजे प्राजु,श्री,लुक्या आणि मी लोकल पकडली....पनवेल पर्यंत लोकल आणि
तिथुन ठाकुरवाडीची बस इथपर्यंत सगळ plan के मुताबिक झालं....तिकडे ठाकुरवाडीला काही खायला मिळणार नाही म्हणुन लुक्या आणि श्री पेटपूजेची सोय करण्यासाठी बसमधून उतरले....
तितक्यात बसने सुटण्याची तयारी सुरू केली......conductor ला समजावण्याचा व्यर्थ प्रयत्न करून जमेल ते सामान गोळा करून मी आणि प्राजु बसमधून उतरलो....ह्या सगळ्या धावपळीत श्री ची bag मात्र ठरवलेल्या plan ला चिकटुन राहीली ....आणि बस मधून पुढे निघुन गेली....नंतर थोड्याश्या फिल्मी ईश्टाइल मधे रीक्षातून बसचा पाठलाग करत आम्ही ठाकुरवाडीला पोचलो......तिथे बस मिळाल्यावर आधीच गड सर झाल्याच समाधान आमच्या चेहर्यावरुन ओसांडत होतं....तर तात्पर्य अस की जरी ठाकुरवाडीला येणारी बस चुकली तरी हताश होण्यासारख काही नाही......अन्य मार्गांनी तिथे पोचता येत....;)
पुण्याहुन नेहा,रंजिनी,इंद्रजीत आणि अमोल अशी चौकडी आम्हाला join करणार होती......जवळ्पास ३ तासांची कडक तपश्चर्या केल्यावर ते आम्हाला प्रसन्न झाले......सूर्य तोपर्यंत चांगलाच तापला होता....अगदी भर उन्हातच ट्रेक करायची आम्हाला हौस असल्याने ११-११.३० च्या सुमारास आमच्या भटकंतीला सुरूवात झाली....उन्हाचे चटके खात आम्ही हळुहळु पुढे सरकत होतो....मी आणि प्राजुने तर वाटेतच शरणागती पत्करली....आणि कलावंतीणीला भेटायचा आमचा मनसुबा रद्द केला....पण लुक्याने आणि श्री ने अक्षरश: हल्याहल्या करत आम्हाला तयार केल....
वाटेत एखाद झाड दिसल....किंवा एखादी वार्याची झुळुक आली की एकदम "जगी सर्वसुखी असा कोण आहे" ची अनुभूती येत होती....३-४ तासांच्या प्रवासानंतर कलावंतीण बुरूजाच्या खर्या पायथ्याला पोचलो....तिथे १७-१८ घरांच एक गाव आहे....गरिबी लगेच दिसणार्या त्या गावात बहुधा आदीवासी लोक राहतात......त्यांची भाषा मराठीच्या आसपास आहे....तिथे एका आजीबाईनी आम्हाला झर्याच पाणी आणून दीलं....त्यांच्या बोलण्यावरून कळल की जीवनावश्यक कुठलीही गोष्ट आणण्यासाठी त्यांना ठाकूरवाडीला गड उतरून जाव लागत....इथे ट्रेक म्हणजे हौस म्हणुन एकदा गड चढताना सुध्दा आम्ही उन्हाला,उकाड्याला वॆतागलो होतो......त्या आजींचा पाहुणचार स्वीकारून आम्ही बुरूज सर करण्यासाठी सज्ज झालो....
बुरूज हा अत्यंत खड्या चढाचा आहे....वाटेत मधेच छोट्या छोट्या पायर्या आहेत......इतक्या उंचावर ही कारागीरी करायची ईच्छा का झाली असेल देव जाणे,....अर्ध्या तासात आम्ही बुरूजाच्या माथ्यावर पोचलो....तिथे पोचल्यावर इतका वेळ उन्हाचा त्रास सहन केल्याच सार्थक वाटु लागलं....सूर्य ही हळुहळु सौम्य झाला....तेव्हा एकेकाला कंठ फ़ुटु लागला......गप्पा आणि फोटो सेशन ला उत आला होता......तासभर टाईमपास करून आम्ही परतीची वाट पकडली....सूर्योबा आपल्या घरी गेल्याने १-१.३० तासातच आम्ही पायथ्याला पोचलो......उतरतानाच पावसाळ्यात किंवा हीवाळ्यात परत इकडे यायच ठरवुन most awaited असा हा ट्रेक वेगळ्याच द्रुष्टीने अविस्मरणीय ठरला.....:)

Wednesday, October 21, 2009

कात्रज सिंहगड ट्रेक माझ्य़ा नजरेतुन!!!!!!



कात्रज सिंहगड ट्रेक एकदातरी करायचाच असं ठरवल होतं....
स्वत:चा stamina टेस्ट करण्याचा हा चांगला उपाय आहे...
शेवटी ह्या ट्रेकचा सूमुहुर्त आला॥२४ december २००७, मी,श्रीकांत,प्रवीण,इंद्रजीत आणि पुरुषोत्तम असे शूर(?) आम्ही सरदार कात्रज-सिंहगड सर करण्यासाठी मोठ्या उत्साहात निघालो...
श्रीक्याने ट्रेक सुरु करण्यापुर्वीच सगळ्यांचा २-३ km warm up करवुन घेतला...
ट्रेक पुर्णपणे PLANNED(?) असल्याने कात्रज पासुन बोगद्यापर्यंत आम्हाला नेण्यासाठी गाड्यांची रांग लागली होती...
जवळपास १५ min नी एका मारुती van ची निवड करुन आम्ही ट्रेकला खर्या अर्थाने सुरुवात केली॥बोगद्यावर चढुन पुण्याकडे बघत चालताना पहिलाच डोंगर चुकलो...
पण पव्याला वेळीच रस्ता आठवल्याने तो मोठ्या.... संकटातुन वाचला....:)
पहिल्या डोंगरावर पोचल्यानंतर सिंह्गडावरचा लाल दिवा दिसु लागला...
आणि आता फ़क्त ह्या दिव्याकडे बघत चालत सुटायच..अशी आमच्या लीडर पव्यानेcommand सोडली...

वाटेतल्या गवतावरुन सारखी घसरगुंडी होत होती...
डोंगर चढण्यापेक्शा उतरण्याची जास्त भिती वाटत होती...
एक एक करत डोंगर मागे पडत होते...
पुढच्या डोंगरावर पोचल्यावर मागे वळुन पाहाताना खरचं आपण आत्ता तिथे होतो का असाप्रश्नपडत होता...
निम्मे डोंगर चढल्यावर एका डोंगरावर विश्रांती घ्यायच ठरलं...
आजुबाजुला फ़क्त गवतं,झाडं,दूरवर वस्तीची चाहुल नाही...
आणि डोक्यावर चंद्र॥अशा वातावरणात आम्ही तळ ठोकला होता...
पव्याने नेहमीच्याच जबाबदारीने आणलेल्या खजुरांचा समाचार घेत college च्या आठवणीत रमण्याचा आनंद खूप सही होता...
गप्पांमधे अर्धा तास कसा गेला ते कळलचं नाही...
परत एकदा नव्या जोमाने डोंगर पालथे घालायला सुरुवात केली...
हळुहळु झाडांची गर्दी वाढत होती ... थंडीसुद्धा जाणवत होती... पुर्णपणे दरीत उतरायच आणि डोंगर चढताना वळसा घालुन पुढे जायच असा क्रम सुरु होता...
कसलेही भास होत होते ज्यामुळे मला जाम भिती वाटत होती...
वारा आणि झाडांची मॆफिल रंगात आली होती...
प्रत्तेक गोष्ट स्वत:च अस्तित्त्व पटवुन देत होती....
श्रीक्या काहीतरी टाईमपास करत माझ लक्ष विचलित करत होता...
स्वत:च्या सावलीची पण भिती वाटत होती...
श्रीक्याचा हात धरत भिती कमी करायचा माझा प्रयत्न सुरु होता ... आणि.......
हळुहळु सूर्याची चाहुल लागली ... मी शेवटचा डोंगर अनवाणी पूर्ण केला...
आणि finally सरळ रस्त्याला लागलो...
तिथुन सरळ गाडी ने सिंह्गडाच्या पायथ्यापर्यंत गेलो...गडावर मस्त पिठलं॥भाकरीचा फ़डशा पाडला...
आणि अशा तर्हेने कात्रज-सिंहगड ट्रेक पुर्णत्वाला पोचला..:)




गंध तुझ्या आठवणींचा...........!!!!!!!!!!!!


तुझी आठवण येतानाच सारे जग बदलवुन् टाकते...
माझी छोटीशी दुनिया सप्तरंगात रंगवुन जाते॥!!!!

तुझी आठवण येतानाच ग्रीष्मातही पावसाळ्याचा भास होतो...
आपल्या सरींमधे आधीच हळव्या माझ्या मनाला चिंब भिजवतो...!!!!

तुझी आठवण येताच मी माझी उरत नाही...
स्वत:ला शोधताना रात्रसुध्दा पुरत नाही....!!!!

तुझ्या आठवणीत माझी रात्र रात्र जागते...
तुझ्याच गीतासवे येणारी पहाट मोहरते...!!!!

तु असा कसा रे एकदम अलिप्त,अनभिज्ञ...
तुझ्या तर् गावीही नसते माझी ही अवस्था...
तरीही मला वेड लावतो गंध तुझ्या आठवणींचा...........!!!!!!!!!!!!

वास्तव!!!!!!!!!!!!!!!!


बेसावधशा क्षणी तुझी आठवण येते ...
स्वत:सवे माझ्या मनाला क्षितीजापार घेउन जाते ...!!!!

नवीनच एक जग आसमंतात सजते...
जिथे राजा तु आणि राणी मी असते... !!!!

स्वप्नातल्या राज्यात सगळीकडे आनंदी आनंद...
पाहीजे तेव्हा पाऊस पाहीजे तेव्हा वसंत...
कधी चंद्राची होडी ... कधी तार्यांची शिडी...

वार्याच्या वेगाने ढगांच्या पार उडी...
तितक्यात हलकीशी झुळुक येते...

क्षणार्धात माझ्या मनाला वास्तवात आणते...
स्वप्नातलं राज्य स्वप्नातच विरते...

कधी सत्यात येणार नसलं तरी एका स्वप्नात आयुष्य सरते... !!!!!!!!!!!!


वेडी भाषा!!!!!!!!!!


वेड्या लोकांची वेडी ही भाषा..
ना शब्दांचं बंधन..ना व्याकरणाच्या सीमारेषा....!!!!

भाषेला ह्या काय बरं नाव????
कविता म्हणू की मनातल्या भावनांचा ठावं....!!!!

कविता आणि मनं वेगळे थोडीच असतात...
एकमेकांच्या संगतीत दोघेही बहरतात....!!!!

कवितेच्या ओळी जणू सागरलहरी....
असंख्य भावना मनपटलावर विहरी......!!!!

मनावर जेव्हा भावनांचा रंग चढे...
कवितेलाही मग सुंदर स्वप्न पडे...!!!!

स्वप्नांच्या गावा न लागे कोणाचीही साथ....
मन कविता फ़िरे हाती घालुन हात......!!!!

आठवणी!!!!!!!!!!!

परत एकदा College la जायच ठरवलं...आपल्याच त्या कट्ट्यावर परत एकदा रमायचं ठरवलं..बघायच होत तो कितीसा आपला राहीलायं..तसं धाडस नव्हत होणार त्याला दुसर्यांसोबत रमताना बघायचं..पण मग एकदा अट्टहासाने गेलेच..पाहीलं तर सगळ बदललेलं..तिथे तर फ़क्त अनोळखी माणसांची गर्दी..आणि पसरलेल्या माझ्या आठवणींच्या सावल्या.त्यातच आपल्या माणसाचा शोध घ्यायचा मनाचा नेहमीचाच खेळ..:::::"नेहमीप्रमाणे मी एकटीच कट्ट्यावर लवकर आलेली..त्याची वाट बघायला लागणार म्हणुन वॆतागलेली..आणि परत एकदा त्याच विचारात गढलेली..कितीही ठरवल त्याला एकदातरी वाट बघायला लावायची तरीही कशी काय येते मी घड्याळाच्या काट्याआधीच..त्यात त्याचा तो दोष काय????परत एकदा तोच निरर्थक प्रश्न...वेळेआधी येऊन स्व:तच त्याच्यावर चिडायचं..मग स्व:तला इकडे-तिकडे रमवण्याचा प्रयत्न...येतो तो नेहमीप्रमाणे एक-दोन तास उशीरा..आल्यावर अगदी ठरल्याप्रमाणे देतोही कारणे उशीरा आल्याची..आणि परत एकदा वेडे ठरवतो आपल्यालाचं...त्याच्यावरचा राग तो आल्यावर कुठे जातो हे आजपर्यंत नाही कळल..:::::विचारात इतकी गुंग झाले...वास्तवाच भानच नाही राहीलं...अन अचानक उमगलं...आज कितीही वाट पाहिली तरी कुणीही येणारं नाहीए..उशीरा येऊन वेळ न पाळल्याची कारण देणार नाहीए..नेहमीप्रमाणेच रुसलेल्या माझा रुसवा घालवणार नाहीए..::आज अस वाटत...कारण देण्यासाठी का होइना..कोणीतरी यावं...त्यासाठी मग किती वाट पहायची माझी तयारी आहे..............

Tuesday, October 20, 2009

संवाद.!!!!!!!!!!!!!!!!



भेटलो जेव्हा सख्या आपण मनाने...
शब्दांएवजी संवाद साधला तेव्हा अबोल्याने...

शब्द म्हणजेच संवाद हट्ट असे तुझा...
अन मला वाटे अबोल संवादातच असते मजा....

डोळ्यातले भाव सांगतात अस काही....
कुठलाच शब्द त्या भावनेसाठी जुळत नाही....

हातातला हात सांगतो तुझ्याही नकळत तुझ्या मनीचे गुपित ..
।सांग बर शब्द हे सार सांगतील कुठल्या लिपीत....

शब्दांच्या जाळ्यात अडकवु नको रे तु स्वत:ला......
तुझ माझ नातं अनोळखी आहे त्या पामराला...............!!!!!!