Tuesday, October 20, 2009

स्वप्न...!!!!!!!!!!!!!!!


आठवणींची गर्दी लेवून सजली कातरवेळ..
स्वप्न आणि सत्याचा सुरु झाला खेळ!!
दमछाक होते माझी मनाला सत्यात आणताना..
त्या वेड्याला दीसतच नाही समोरचे म्रुगजळ विरताना!!
मला वाटतं स्वप्नांशी तु घट्ट मॆत्री केली असावी..
उगाच का त्याने मन्मनी तुझीच चित्रे रंगवावी!!!
माझ्या झोपेचा तुझा आग्रह आत्ता कुठे कळतोय मला..
अरे राजा पण मिटल्या डोळ्यांनीच स्वप्नं बघतात.....कुणी सांगीतलं तुला????

2 comments:

  1. Ekadam jamun gelay , khas karun shevatachi ol
    मिटल्या डोळ्यांनीच स्वप्नं बघतात.....कुणी सांगीतलं तुला????
    wah , mast ch

    ReplyDelete